• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ; विरोधी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने...



सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे. या याचिका या परीक्षांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या असल्याचं देखील न्यायालयानं सांगितले. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या संसंर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता., असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवले यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे. अशा होणार दहावी बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर ५ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.


महत्वाच्या बातम्या



हवामान