• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद, द्वारा प्रकाशीत 'स्त्री दर्पण' विशेषांकाचे उद्घाटन संपन्न

भंडारा येथील जेष्ठ साहित्यिका अस्मिता लेहनदास मेश्राम, यांच्या मुख्य संपादनात "स्त्री दर्पण" हे जागतिक महिला...



भंडारा येथील जेष्ठ साहित्यिका अस्मिता लेहनदास मेश्राम, यांच्या मुख्य संपादनात "स्त्री दर्पण" हे जागतिक महिला दिनानिमित्त प्रकाशीत झालेले विशेषांकाचे १२ मार्च २०२२ रोजी नागपूर येथे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा समता नंदागवळी, उद्धाटक जेष्ठ व आंबेडकरी. साहित्यिक डाॅ.धनराज डाहाट, प्रमुख उपस्थिती प्रा. विलास गजभिये, लेखिका सुजाता लोखंडे, डाॅ.सुनंदा जुलमे, प्रा.ह्दय चक्रधर, अॅड- अस्मिता तिडके, व कवी. एम.एस.जांभूळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री शीला आठवले यांनी केले. तर प्रास्ताविक संपादिका अस्मिता लेहनदास मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अस्मिता मेश्राम यांनी मानले. या प्रसंगी शाक्यसिंह बुध्दिष्ट सोसायटी औरंगाबाद द्वारा एक दिवसीय कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाचे सुत्रसंचालन जेष्ठ साहित्यिका व संपादिका अस्मिता मेश्राम-भंडारा यांनी केले. कवी संमेलनात सहभागी कवींना संस्थेकडून प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान