• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे ; आयसीएसईकडून बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

सध्या राज्याच्या बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे सत्र सुरु आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट...



सध्या राज्याच्या बोर्डाच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे सत्र सुरु आहे. काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशननं बारावीच्या सत्र २ परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. बारावी परीक्षेचं नवीन वेळापत्रक cisce.org वर जाहीर करण्यात आले आहे. आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी संबंधित वेबसाईटवर भेट देऊन नवीन वेळापत्रक पाहू शकतात. आयसीएसईनं जेईई मेन परीक्षेच्या तारखा आणि बारावीच्या तारखा एकाच दिवशी येत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. आयएससी १२ वी सत्र परीक्षा सीआयएससीई द्वारे घेतल्या जातात. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावर्षीपासून परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत आहेत. त्यामुळं परीक्षेची वेळ दीड तास करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी १० मिनिटं वेळ दिला जाणार नाही. आयएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवे बदल माहिती करुन घेण्याची आवश्यकता आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान