• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा दर

देशात मागील काही दिवसांपासून सोन आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र आता पुन्हा एकदा...



देशात मागील काही दिवसांपासून सोन आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याचा भाव ५१ हजारांच्या वर तर चांदीचा भाव ६२ हजारांच्या पार गेला आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत ७ रुपयांनी किरकोळ वाढून ५१,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली. यापूर्वी शनिवारी सोन्याचा व्यवहार ५१,२५९ रुपयांपासून सुरू होता.या मध्ये चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळच्या व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो ५२ रुपयांनी वाढून ६२,६०० रुपये इतका झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार ६२,४५० रुपयांवर सुरू होता, परंतु मागणी आणि खरेदी वाढल्याने लवकरच त्याची किंमत ०.०८टक्क्यांनी वाढून ६२,००० वर पोहोचली. मुंबई - २४ कॅरेट सोन्याचा दर - ५२,५५० रुपये (प्रति तोळा) नवी दिल्ली - २४ कॅरेट सोन्याचा दर - ५२,४६०रुपये (प्रति तोळा) चैन्नई- २४ कॅरेट सोन्याचा दर - ५२,७०० रुपये (प्रति तोळा) कोलकाता- २४ कॅरेट सोन्याचा दर - ५२,४८० रुपये (प्रति तोळा)


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान