• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


औरंगाबाद पाणी प्रश्नावरून भाजपसोबत मनसे आक्रमक ; मुख्यमंत्र्यांना पाठवणार २५ हजार पत्र

औरंगाबाद शहरातील ज्वलंत पाण्याचा प्रश्नावरून भाजप चांगलच आक्रमक झाले आहे. या पाणी प्रश्नासाठी भाजपातर्फे येत्या २३ मे रोजी औरंगाबादेत मोठं आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनासाठी स्वतःहा विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री...



औरंगाबाद शहरातील ज्वलंत पाण्याचा प्रश्नावरून भाजप चांगलच आक्रमक झाले आहे. या पाणी प्रश्नासाठी भाजपातर्फे येत्या २३ मे रोजी औरंगाबादेत मोठं आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनासाठी स्वतःहा विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे धाबे दणाणले असतानाच आता मनसेनंही या प्रश्नावर रणांगणात उतरायचं ठरवलं आहे. हर्सल तलाव ते जटवाडा नवीन पाइपलाइन दहा दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करता, मग जायकवाडी ते नक्षत्रवाडी पाइपलाइन टाकण्यासाठी २४ वर्षे का लागली, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून औरंगाबाद शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. आधी समांतर जलवाहिनीचे गाजर आणि त्यानंतर सुरु असलेल्या १६८० कोटी रुपयांच्या योजनेचे का, यात शहरातील नागरिक पुरते भाजून निघाले आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. टक्केवारी, कंत्राट आणि टँकर लॉबीपायी १७ लाख लोकांच्या भावना तुडवल्या गेल्या आहेत. आता कितीही दाखवण्याचा प्रयत्न केलात तरी किमान दोन वर्ष ही योजना पूर्णत्वास जाणार नाही. आता मनसे सुद्धा पाणी प्रश्नांवरून आक्रमक झाली आहे. उद्यापासून म्हणजेच १४ मे पासून औरंगाबादेत मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पाणी संघर्ष यात्रा काढणार आहेत. तसेच २५ हजार लोकांकडून पत्रं लिहून घेणार आहेत. नंतर ही पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक भागात नऊ ते दहा दिवसांनी पाणी येते. काही ठिकाणी रात्री ३ वाजता पाणी सोडले जाते. काही लाइनमनला कोणत्या भागात पाणी सोडायचे यावर दबाव टाकला जातो. या समस्यांनी विविध भागातील नागरिक त्रस्त आहेत. या भावना पत्रांतून लिहून घेतल्या जातील.


महत्वाच्या बातम्या



हवामान