• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सध्या राज्यात पावसाचा धुमाकूळ घालत आहे. अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नुकताच मोठी बातमी समोर...



सध्या राज्यात पावसाचा धुमाकूळ घालत आहे. अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता नुकताच मोठी बातमी समोर आली आहे. इंदूरहून अमळनेरला जाणा-या एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली.या एसटीमध्ये ५५ ते ६० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी ३० प्रवासी बेपत्ता असल्याचे कळते आहे. नदीत कोसळलेली एसटी बाहेर काढण्यचे काम सुरू असून, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. हा भीषण अपघात होण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. बस पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला. ही बस इंदूरहून पुण्याला निघाली होती. १५ जणांना वाचवण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बस एसटी महामंडळाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाईन नंबर दिला आहे. ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन असल्याची माहिती मिळाली आहे.चालकाचे नाव चंद्रकांत पाटील तर वाहकाचे नाव प्रकाश चौधरी असल्याची माहिती मिळाली आहे.सकाळी ९.३० च्या आसपास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. 


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान