• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


नवा मोंढा नांदेड येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी सज्ज

नांदेड/प्रतिनिधी : मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मराठा सेवा संघ नांदेडच्या...



नांदेड/प्रतिनिधी : मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मराठा सेवा संघ नांदेडच्या पुढा‌काराने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने नवा मोंढा नांदेड येथील वसतीगृहाचे सुरू केलेले पाच मजली इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले असून प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील हुशार, गरीब व होतकरू मुलींना दहावी-बारावी नंतर पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नांदेड सारख्या ठिकाणी राहून पुढील शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेता येत नव्हते. तसेच ग्रामीण भागातील मुली शहरात राहतांना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येत होत. म्हणून पालक आपल्या मुली विषयी चिंतातूर होते. परंतू आता या बाबींची चिंता करण्याची गरज राहीली नाही. समाजातील विविध स्तरांतील दानशूर व समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीनी सदर वसतीगृह बांधकामासाठी पन्नास रुपयापासून ते पाच लक्ष रूपये पर्यंत सढळ हाताने मदत केली आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या प्रेरणेने नांदेड मराठा सेवा संघ व त्याअंतर्गत काम करणारे जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व सर्व ३३ कक्ष शाखांचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने मराठा सेवा संघाचे जेष्ठ सेवाभावी, निस्वार्थ मंडळी मधुकरराव देशमुख, कै.चंद्रभानराव जवळेकर, इंजी आ.शे.रा पाटील, कामाजी पवार सर, क्षिरसागर सर, शिवाजीराव खुडे (मा.शिक्षणाधिकारी), इंजी सुदेश देशमुख बळेगावकर, मराठा सेवा संघाचे दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर सर, उध्दवराव सुर्यवंशी सर, दोन्ही सचिव रमेश पवार सर, सतिश जाधव सर, पी.के कदम सर, जिजाऊ ब्रिगेड दोन्ही जिल्हाध्यक्षा दक्षिण व उत्तर अरूणाताई जाधव, डाॅ विद्याताई पाटील व त्यांची सर्व टीम व अनेक पदाधिकारी, समाजबांधव,भगिनी, सर्व राजकीय नेते मंडळी तसेच अनेक लोकांच्या परीश्रमाने व मदतीने नांदेड येथे गरिब व होतकरू मुलींच्या शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी या प्रांजळ भावनेने अतिशय कष्टाने तयार करण्यात आलेल्या मराठा मुलींचे होस्टेल पूर्णपणे तयार झालेले असून हे वसतिगृह प्रवेशासाठी सज्ज झाले आहे. या वसतिगृहाचे बांधकाम अतिशय देखणे व दर्जेदार झाले आहे. वसतीगृह बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत उच्च दर्जाचे वापरण्यात आले आहे. त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या मुलींना अत्यंत दर्जेदार वास्तूमध्ये राहत असल्याचा अनुभव येणार आहे. वसतीगृहाची क्षमता शंभर मुलींची असून वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजू मुलींनी https://forms.gle/4zakX1Rr7L8tLpXQ8 या गुगल लिंकवर जावून मोबाईल वरून किंवा नेटकॅफेवरून आॅनलाईन फाॅर्म पूर्णपणे भरावा. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर होणार असून प्रवेश निश्चित झाल्यानंतर नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे होतकरू मुलींनी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समिती व मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान