• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


देगलूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ मदत द्यावी

देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालूका व मुकरमाबाद परिसरात सततच्या पावसामुळे कांही ठिकानी पिके वाहून गेली तर काही ठिकानी...



देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालूका व मुकरमाबाद परिसरात सततच्या पावसामुळे कांही ठिकानी पिके वाहून गेली तर काही ठिकानी पाण्यामुळे पिके जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हावालदील झाला आहे. त्यामुळे देगलूर तालुका व मुक्रमाबाद परीसर ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार मदत देण्याची मागणी देगलूरचे मनसे तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे यानी उपजिल्हा अधिकारी देगलूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यावर अनेक मार्गाने नैसर्गिक अपत्ती येत आहे. पेरणी केली बियाची उगवनच झाली नाही, तेथे दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्या देखील वाया गेल्या आहेत. ज्या शेतात बिचाची उगवन झाली तेथे गोगलगाय खाऊन टाकली त्यामुळे शेतकरी मेटाकूटीला आलेल आसताना या सतंतधार पावसामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच श्रीकांत काळे व अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन जिल्हा अधिकारी देगलूर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, चालु वर्षी शेतकऱ्यांना सरासरी पेक्षा पन्नास टक्के कमी उत्पादन मिळेल. काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे, फोटो यामध्ये न गुंतता सरसकट हेक्टरी पन्नास हजार रूपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत आशी मागणी करत निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी देगलूर, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत. निवेदनावर मनसेचे देगलूर तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे, तालुका उपाध्यक्ष आनंत कामशेट्टे, व्यंकटराव नाईक, विठ्ठल रेड्डी, चंद बोरगे, हाणमंत पुसतवाड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान