देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील हणेगाव भागात नव्याने उभारणी होत असलेल्या सिद्धटेक शेतकरी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राजेश बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जाधव यांनी या...
देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील हणेगाव भागात नव्याने उभारणी होत असलेल्या सिद्धटेक शेतकरी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर राजेश बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जाधव यांनी या कारखान्यात दाखल होत आपला पदभार स्वीकारला आहे. परिसरात साखर कारखान्याअभावी नगदी पीक असलेल्या ऊस लागवडीचे प्रमाण फार कमी झाले आहे. नव्याने या भागात साखर कारखान्याची उभारणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन सचिन देशमुख यांच्या आदेशावरून राजेश बाळासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली. दि. १८ जानेवारी रोजी जाधव यांनी पदभार स्वीकारला. संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक कृष्णकांत पाटील, संचालक आयुब पठाण, प्रशांत पाटील, वसंतराव पाटील, शिवदास मठपती, शेख सय्यद, गणपत पाटील, विनायक पाटील व परिसरातील शेतकरी व्यापारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य