• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


देगलूर येथे ८ फेब्रुवारीला रोजगार मार्गदर्शन व शेतकरी महामेळाव्याचे आयोजन

देगलूर/प्रतिनिधी : देगलूर व परिसरात मागील सात आठ वर्षांपासून शेती, पाणी, शिक्षण व लोकप्रबोधनासाठी सातत्यपूर्ण कार्य...



देगलूर/प्रतिनिधी : देगलूर व परिसरात मागील सात आठ वर्षांपासून शेती, पाणी, शिक्षण व लोकप्रबोधनासाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या विश्व परिवार या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. ८ फेब्रुवारी, बुधवारी सकाळी ११ वा. गोविंद माधव मंगल कार्यालय येथे शेतकरी, महिला बचत गट व तरूणांना रोजगार मार्गदर्शन शिबीर संपन्न होणार आहे. हा मेळावा श्री. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या दिव्य सानिध्यात आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर व हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात ज्यांनी शुन्यातून उद्योग विश्व उभे केले अशा यशस्वी उद्योजकांचे नागरी सत्कार केले जाणार आहे. यावेळी सगरोळीचे प्रमोद देशमुख, कृषी विभागाचे रविशंकर चलवदे, नाबार्डचे दिलीप दमय्यावर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, बँकेचे विभागीय महाव्यवस्थापक नवीनकुमार उप्पलवार, गजानन पातेवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी देगलूर विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकरी, बचत गटातील महिला व तरूणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक कैलास येसगे कावळगावकर यांनी केले आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान