• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज- कमलाकर जमदडे

देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील चैनपूर येथे वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर... राष्ट्रीय सेवा...



देगलूर/प्रतिनिधी : देगलूर तालुक्यातील चैनपूर येथे वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर... राष्ट्रीय सेवा योजना शिबीर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास आयोजित वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण कमलाकर जमदडे जिल्हा प्रधान सचिव. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड, सौ. अर्चना जमदडे कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बिलोली, कार्यक्रमाची सुरुवात बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व व्यसनमुक्तीचे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गीताने करण्यात आले. यावेळी जमदडे यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या अंगात दैव शक्ती असल्याचे सांगून भोंदू बाबा जनतेची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असतात अशा प्रकारे खोटी माहिती देऊन अंधश्रद्धा पसरणाऱ्याला भोंदू बाबाचा नायनाट करण्यासाठी देगलूर तालुक्यातील चैनपुर येथील महादेव मंदिरासमोर धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या वतीने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक प्रयोग दाखवून प्रबोधन करण्यात आले जे भोंदू बाबा अंगात दैव्यशक्ती आहे असे सांगून गुप्तधनाची माहिती सांगतो, करणे भानामती कमी करतो, मूल नाही त्या महिलेस मूल होईल,तुमच्या कुटुंबात कलह,सुख, शांती नांदत, नसेल व इतर समस्या असतील तर ते कमी करीन असे खोटी स्वप्न दाखवून आमिषाला बळी पाडून भोंदू बाबा समाजात अंधश्रद्धा पसरून जनतेची कशी फसवणूक करतात हे वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा अनिस ने भांडाफोड कार्यक्रमातून केला. जगात कोणतेही दैव्यशक्ती माणसाच्या अंगात येत नसून माझ्या अंगात देऊ शकते आहे असे सांगणे, मूल होत नाही त्या महिलेस भुताने झपाटले किंवा भानामती करनी केले आहे असे म्हणून हिणवणे तसेच गुप्तधनाची माहिती देतो असे म्हणने, लहान मुलास डागणे, जादूटोणा करतो म्हणून, धमकी देणे या सर्व गोष्टी अंधश्रद्धा पसरणाऱ्या असून त्याच्या घटनाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा पात्र असल्याचे जमदाडे यांनी सांगितले विद्यार्थ्यांना प्रबोधनातून मार्गदर्शन केले तसेच भानामती करणारे किंवा भूत आहे म्हणून सांगणार यांनी करणे बहुत समक्ष दाखवावे त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २१ लाख रुपये चे बक्षीस देण्यात येईल असे आव्हान यावेळी आणि जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी केले. यावेळी चैनपुरचे सरपंच संदीप वाघमारे, शालेय समिती अध्यक्ष लालू बोरवाड, माजी उप्रपंच नागनाथ नलगोंडे, माजी सरपंच विठ्ठल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. भिमराव माळगे, शिक्षक, विद्यार्थी, पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान