• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


महाविकास आघाडीच्या वतीने हणेगाव येथे विजयी आनंदोत्सव साजरा

देगलूर/प्रतिनिधी : तालुक्यातील हणेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या...देगलूर/प्रतिनिधी : तालुक्यातील हणेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळाल्याबद्दल व औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून आमदार विक्रम काळे यांची चौथ्यांदा निवड झाल्या बद्दल महविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व घटक पक्ष यांच्या वतीने मिठाई वाटप व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव देशमुख शिळवणीकर, काँग्रेसचे मा तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर, शिवसेनेचे बालाजी पाटील इंगळे, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीप पाटील बंदखडके, हज्जूशेठ चमकुडे, प्रवीण इनामदार, शिवाजी पाटील शिंदे, पत्रकार किशोर आडेकर, बालाजी चोपडे, मोईन शेख यांच्यासह महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करून विजयी आनंदोत्सव साजरा केला.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान