• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


खानापूर-मुखेड राज्य महामार्गावरील अर्धवट कामामुळे वाहतुकीस अडथळा; कारवाई करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

देगलूर/प्रतिनिधी : खानापूर-मुखेड राज्य महामार्ग १६१ मधील खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रोडचे काम अर्धवट केल्यामुळे...देगलूर/प्रतिनिधी : खानापूर-मुखेड राज्य महामार्ग १६१ मधील खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रोडचे काम अर्धवट केल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकी सातोना त्रास होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून कारवाई करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. खानापूर ते मुखेड राज्य महामार्ग १६१ मधील खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रोडचे काम अर्धवट केल्यामुळे वाहतुकीस तसेच नागरिकांना अतोनात त्रास होत आहे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य केंद्र मुख्य रस्त्यावर आहे या रोडचे धूळ दवाखान्यात जाऊन गरोदर स्त्री इतर रुग्णांना दमा व खोकल्यांचा इतर आजारांना त्रास होत आहे खानापूर ते मुखेड राज्य महामार्ग १६१ मधील खानापूर ते खानापूर फाटा पर्यंत रोडचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी तात्काळ मान्य करून खानापूर फाटा ते खानापूर पर्यंतचे रोडचे काम करण्यास विलंब अथवा टाळाटाळ झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या प्रशासनावर राहील असे उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर गजानन बरसमवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, मनमत परबते मनसे कार्यकर्ता, आनंद उत्तमराव कामशेट्टी मनसे तालुका उपाध्यक्ष, चंदू अक्कमवार मनसे देगलूर बिलोली-विधानसभा अध्यक्ष आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान