रवी शास्त्री यांना निवड समितीच्या बैठकीला प्रवेश नाही?

मुंबई : माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे स्पष्ट होताच टीम निवड समितीच्या बैठकीला कोच रवी शास्त्री यांना नो एंट्री असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेसाठी २४ ऑक्टोबरला...मुंबई : माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे स्पष्ट होताच टीम निवड समितीच्या बैठकीला कोच रवी शास्त्री यांना नो एंट्री असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेसाठी २४ ऑक्टोबरला टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. या बैठकीला कॅप्टन विराट कोहली आणि बोर्डाचे सेक्रेटरी उपस्थित राहतील. मात्र कोच रवी शास्त्री या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे सौरव गांगुलीने लोढा समितीच्या शिफारशी पुढे करत स्पष्ट केले आहे. सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीने रवी शास्त्री यांना कोचपदी नियुक्त करण्याच्या मागणीला सौरव गांगुलीने विरोध केला होता. दरम्यान, बांग्लादेश मालिकेसाठी टीम इंडियाची निवड २१ ऑक्टोबरला होणार होती, परंतु त्याची तारीख बदलण्यात आली आहे. आता २४ ऑक्टोबर रोजी या संघाची निवड होईल. त्याचबरोबर २३ ऑक्टोबरला सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. जरी ते निवड समितीच्या बैठकीत भाग घेऊ शकत नसले तरी ते अशा परिस्थितीत सभेपूर्वी निवड समितीच्या सदस्यांशी बोलू शकतात. संघाच्या निवडीदरम्यान निवड समिती सदस्य, कर्णधार विराट कोहली आणि मंडळाचे सचिव हजर असतील, पण प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रवेश होणार नाही. सौरव गांगुली अध्यक्ष झाल्याने क्रिकेटमधील गोंधळ दूर करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गेली तीन-चार वर्षे घरगुती क्रिकेट न खेळण्याची जबाबदारी नव्हती, पण आता प्रत्येक खेळाडूला, असे केले तर त्याला उत्तर द्यावे लागणार आहे.

हवामान