कलर्स मराठी अवॉर्ड २०१९

मुंबई :मनोरंजनाच्या नव्या पर्वामध्ये मराठी रसिकांसमोर मनोरंजनाचा एक नवा मापदंड उभा करण्यात कलर्स मराठी वाहिनाचा मोलाचा वाटा आहे. पहिल्यावहिल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय मालिका या विभागाच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली पण...मुंबई :मनोरंजनाच्या नव्या पर्वामध्ये मराठी रसिकांसमोर मनोरंजनाचा एक नवा मापदंड उभा करण्यात कलर्स मराठी वाहिनाचा मोलाचा वाटा आहे. पहिल्यावहिल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये लोकप्रिय मालिका या विभागाच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली पण बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने लोकप्रिय मालिकेचा मान पटकावला आणि लोकप्रिय नायक आणि नायिकेचा मान मिळाला सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील सिद्धार्थ आणि अनुश्रीला... तर जीव झाला येडापिसा मालिकेमधील लष्करे कुटुंब ठरलं लोकप्रिय कुटुंब...लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा (विभागून) देण्यात आले घाडगे & सून मधील वसुधा आणि जीव झाला येडापिसा मालिकेतील मंगल. तर लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील पंच यांना मिळाला. "कुटुंब" म्हटलं की सुख दुःखात साथ ही आलीच. कुटुंबामध्ये जिव्हाळा, प्रेम, माया, रूसवे – फुगवे हे पण आलेच. प्रेक्षकांवर अनेक वर्षांपासून विविध रंगाची उधळण करत असलेले मनोरंजन विश्वातील एक कुटुंब ज्याने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहूरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून अल्पावधीतच आपली विशेष ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले, ते कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”... या कुटुंबाला साथ लाभली ती आपणासारख्या मायबाप प्रेक्षकांची ज्यांनी कार्यक्रमांवर भरभरून प्रेम केले आणि अजूनही करत आहात. महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांचे वाहिनीशी एक अतूट नाते जोडले आहे. मालिकांतील व्यक्तिरेखांशी रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहूना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. आता हेच ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कलर्स मराठी पहिल्यांदाच घेऊन आले होते आपल्या माणसांचा “आनंद सोहळा”. कोणते कुटुंब ठरले सगळ्यात लोकप्रिय, कोणती जोडी ठरली लोकप्रिय ? कोणत्या कलाकारांनी पटकवला लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री होण्याचा मान ? तुमच्या साठी, तुमच्या सोबत, तुम्हाला आनंद देण्यासाठी कलर्स मराठी घेऊन आले होते सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा - कलर्स मराठी अवॉर्ड २०१९

हवामान