कशी राखाल जीन्स पॅंटची निगा...

प्रत्येकाकडे किमान एक तरी जीन्स असतेच. अगदी लहान मुलांना कपडे घेतानाही हल्ली जीन्सना प्राधान्य दिले जाते. कपाटात जीन्स नाही अशी व्यक्ती आताच्या जमान्यात शोधूनच सापडेल. कारण जीन्स टिकाऊ असतात तशाच त्या मळखाऊ असतात. जीन्समुळे आपले...प्रत्येकाकडे किमान एक तरी जीन्स असतेच. अगदी लहान मुलांना कपडे घेतानाही हल्ली जीन्सना प्राधान्य दिले जाते. कपाटात जीन्स नाही अशी व्यक्ती आताच्या जमान्यात शोधूनच सापडेल. कारण जीन्स टिकाऊ असतात तशाच त्या मळखाऊ असतात. जीन्समुळे आपले व्यक्तीमत्व वेगळेच दिसते हे खरे असले तरी हीच जीन्स सतत वापरून तिला वास येत असेल, तिला सुरकुत्या पडल्या असतील तर ती नक्‍कीच वाईट दिसते. सध्या फेडेड जीन्सची फॅशन असली तरीही नकोत्या ठिकाणी तिचा रंग फिकट झाला तर ते निश्‍चितच वाईट दिसते. म्हणूनच जीन्स नेहमी स्वच्छ आणि नवी दिसावी यासाठी काळजी घ्यायला हवी. हाताने धुवा – जीन्स शक्‍य असल्यास हाताने धुवावी त्यामुळे ती आटत नाही. हाताने धुतल्याने ती ताणली जात नाही. जीन्स रफ दिसत असली तरीही ती प्रत्यक्षात तशी नसते. तिची योग्य काळजी घेतली पाहिजे. बादलीभर पाणी त्यात 2-3 चमचे साबण पावडर टाकावी मग हाताने धुवून साधारण एक तासाने ती निथळून वाळत टाकावी. फ्रीजरमध्ये जीन्स- जीन्स फ्रीजरमध्ये ठेवावी असे आपण वाचतो. त्यामुळे जीन्सला येणारा दुर्गंध निघून जातो आणि जीन्समधील जीवाणू तसेच इतर हानिकारक घटक नष्ट होतात. यासाठी जीन्सची व्यवस्थित घडी घालून ती प्लास्टिक बॅगमध्ये ठेवावी. बॅग चारही बाजूंनी बंद करावी आणि फ्रीजरमध्ये ठेवावी. या प्रक्रियेला स्टरलायझिंग करणे असे म्हणतात. त्यामुळे जीन्समधील बॅक्‍टेरिया नष्ट होतात. तसेच पूर्ण दिवस ती फ्रेश राहते. सतत घातल्याने येणारा दुर्गंध निघून जातो. टॅग वाचा – जीन्सला लावलेला टॅग वाचायला हवा. त्यामध्ये जीन्स कोणत्या कापडापासून बनवलेली आहे तसेच ती कशी धुवावी ही माहिती दिलेली असते. जीन्सवर प्रीवॉश किंवा प्री डिस्ट्रेस्ड लिहिलेले असेल तर त्याचा अर्थ ही जीन्स आधी वापरली गेली आणि धुतली गेली आहे. अशा परिस्थितीत जीन्स थंड पाण्यात धुवावी. आपल्या जीन्सवर कच्चा, सुका किंवा सिंगल वॉश असे लेबल लावले असेल तर त्याचा अर्थ असा की ही जीन्स अजून धुतली गेली नाही. तसेच तिचा रंगही जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे जीन्सवर दिलेल्या सूचनांचे पालन करून ती धुवावी. जीन्सवर सन्फोरिज्ड असा टॅग लावला असेल तर जीन्स अशा प्रकारे तयार झाली असेल की ती आकसणार नाही. बहुतेकदा जीन्सवर सन्फोरिज्ड असाच टॅग असतो. थोडक्‍यात न आकसणाऱ्या कपड्यापासून ती तयार केलेली असते. अनसन्फोरिज्ड टॅग किंवा श्रिंक टू फिटचा अर्थ जीन्स मापापेक्षा काही इंच मोठी आहे आणि ती धुतल्यावर आकसणार आहे. अशा वेळी जीन्स गरम पाण्यात भिजवावी ज्यामुळे ती आकसेल. एकदा ती आकसली की तिचा नियमित वापर करता येऊ शकतो. ड्राय क्‍लीन ः जीन्स शक्‍यतो ड्राय क्‍लीन करावी. त्यामुळे जीन्सला लागलेली धूळ, त्यावरील जंतू आणि डाग निघून जाण्यास मदत होते. जीन्सवरील डाग काढण्यासाठी ड्राय क्‍लीन हा सर्वोत्तम उपाय आहे. जीन्सच्या तळाला लागलेले तेल सहजपणे निघून जाते. ड्राय क्‍लीन तुलनेने महागडा पर्याय असला तरीही त्यामुळे जीन्सचे आयुष्य वाढते. सूर्यप्रकाश- जीन्स सुकवताना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी. ती थेट उन्हात वाळत घालू नये. हवेत सुकण्यासाठी जीन्सला दोन दिवस लागतात त्यामुळे योग्य नियोजन करून ती धुवावी. त्याशिवाय फॅब्रिक सॉफ्टनर्सचा वापर करावा. त्यामुळे डेनिम सॉफ्ट होते आणि ती खूप अधिक काळ नव्यासारखी दिसू शकते. या काही गोष्टीं लक्षात ठेवल्यास जीन्स नक्कीच अधिक टिकेल. नव्यासारखी दिसेल.

हवामान