रणवीरसोबतच्या लग्नानंतरच्या नात्याविषयी दीपिका म्हणाली

मुंबई : हिंदी कलाविश्वातील मोस्ट हॅपनिंग जोडी म्हणून कोणत्या जोडीकडे पाहिलं जातं असा प्रश्न विचारल्यास एक नाव समोर येतं. या प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण deepika padukone आणि रणवीर सिंग ranveer singh या जोडीचं नाव....मुंबई : हिंदी कलाविश्वातील मोस्ट हॅपनिंग जोडी म्हणून कोणत्या जोडीकडे पाहिलं जातं असा प्रश्न विचारल्यास एक नाव समोर येतं. या प्रश्नाचं उत्तर म्हणून समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण deepika padukone आणि रणवीर सिंग ranveer singh या जोडीचं नाव. वर्षभरापूर्वीच या दोघांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव देत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 'दीप- वीर' विवाहबंधनात अडकल्यानंतरही त्यांनी चित्रपटांवरील त्यांची एकाग्रता हटवली नाही. मुळात कामाच्या व्यापातही त्यांनी नात्यालाही तितकंच प्राधान्य दिलं. याचविषयी दीपिकाने माध्यमांशी संवाद साधताना वैवाहिक जीवनात पदार्पण केल्यानंतर रणवीरसोबतच्या तिच्या नात्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला. 'लग्नापूर्वी लिव-इनमध्ये राहायचं नाही हे आम्ही दोघांनीही ठरवलं होतं. मुळात या बाबतीत आम्ही थोडे पारंपरिक विचारसरणीचे आहोत. (लग्नानंतर) एकमेकांसोबत राहणं, आणखी चांगल्या पद्धतीने ओळखणं यात खरी मजा आहे', असं दीपिका म्हणाली. आतापर्यंत 'गोलियों की रासलीला- राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमधून काम करणारी ही जोडी येत्या काळात कबीर खान दिग्दर्शित '`८३' या चित्रपटातूनही झळकणार आहे. लग्नानंतर दीपिका आणि रणवीरचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट असेल. या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंगच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच रोमी देव यांच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. वैवाहिक नात्यानंतर चित्रपटांच्या सेटवर या दोघांच्याही वर्तणूकीत, बदल आले असतील असा समज असेल तर तसं नाहीये. खुद्द दीपिकानेच याबाबत वक्तव्य केलं. 'सारंकाही आधीसारखंच आहे. फार काहीच बदललेलं नाही. आम्ही दोघंही एकमेकांच्या कामाप्रती अतिशय समर्पक आहोत. सेटवर काम करत असतानाही असंच असतं. आमच्या नात्याचा तेव्हा मुद्दाच नसतो. त्या क्षणाला आम्ही एकमेकांच्या पात्रांविषयी जास्त विचार करत असतो. जेव्हा एखाद्या दृश्यासाठी कॅमेरा सुरु होतो तेव्हा आम्ही पती- पत्नी म्हणून नव्हे, तर कलाकार म्हणून त्याच्यापुढे उभे असतो', असं दीपिकाने सांगितलं. सेलिब्रिटी वर्तुळात वावरत असताना विशेषत: आपल्यावर अनेकांच्या नजरा खिळलेल्या असताना दीपिका आणि रणवीर खऱ्या अर्थाने त्यांच्या वागण्या- बोलण्यातून इतरांना आदर्श #CoupleGoals देत असतात हे नाकारता येत नाही.

हवामान