केसांना तेल लावताना घ्या ‘ही’ काळजी

काळेशार, घनदाट, लांबसडक केसांमुळे प्रत्येक महिलेच्या सौंदर्यात अधिक भर पडते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी केसांना तेलानं मसाज करणं फायदेशीर असल्याचं मानलं जातं. तेलानं मसाज केल्यानं केसांचं योग्य पोषण होतं, केसांना वेगळीच चमक मिळते....काळेशार, घनदाट, लांबसडक केसांमुळे प्रत्येक महिलेच्या सौंदर्यात अधिक भर पडते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी केसांना तेलानं मसाज करणं फायदेशीर असल्याचं मानलं जातं. तेलानं मसाज केल्यानं केसांचं योग्य पोषण होतं, केसांना वेगळीच चमक मिळते. केसांना तेलमसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ कमकुवत केसांना पोषण मिळते, केसगळती नियंत्रणात येऊन केसांची चांगल्या पद्धतीनं वाढ होते. पण तेल मसाज करताना काही गोष्टींसदर्भात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची भीती आहे. तेल मसाजसंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया. तेल हलके गरम करावे तेल मसाजमुळे केसांचं योग्य पोषण होतं शिवाय मेंदूलाही आराम मिळतो. केसांना तेल लावण्यापूर्वी ते हलकेसे गरम करावे. गरम केलेले तेल केस तसंच टाळूपर्यंत सहजरित्या पोहोचते. ज्यामुळे केसांना चांगले फायदेही मिळतात. (वाचा : जेवणानंतर तुम्हीही 'या' चुका करताय? शरीराचं होतंय नुकसान) तेल गरम करण्याची पद्धत - एका वाटीमध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यावे आणि दहा सेकंदांसाठी तेल मायक्रोव्हेवमध्ये गरम करावं. - तेलाची वाटी गरम पाण्यामध्ये ठेवूनही तेल हलके गरम केलं जाऊ शकतं. - तेल उकळता कामा नये. याामुळे तेलातील पोषकतत्त्वे कमी किंवा नष्ट होतात. (वाचा : घरीच करा केसांच स्ट्रेटनिंग) टाळू रगडून मसाज करू नये कित्येक जण केसांना तेल लावताना टाळूवर जोर देऊन किंवा रगडून मसाज करतात. पण यामुळे केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. केस तुटण्याची शक्यता अधिक असते. हातांचा जोर देऊन मसाज केल्यास केसांचा गुंता देखील होतो, एवढंच नाही तर केसांच्या मुळांचंही नुकसान होतं. त्यामुळे हलक्या हातानं केसांना मसाज करावा.

हवामान