• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


महाराष्ट्रात पुन्हा दुष्काळाचे सावट


राज्यात अशी आहे पावसाची स्थिती




यंदा मान्सून सरासरीएवढा होईल तसेच वेळेवर दाखल होऊन जून व जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खाते, संस्थांनी वर्तवला होता. त्यानुसार निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात तो झालाही. मात्र नंदुरबारमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी तर अकोला, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के कमी पाऊस झाल्याने या चार जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. काही ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मान्सूनपूर्व पाऊस कमी-अधिक फरकाने सर्वत्र पडला होता. मान्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, त्यानंतर पोषक वातावरण असलेल्या ठिकाणीच चांगला पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी भुरभुर होती, तर काही ठिकाणी कोरडेठाक राहिले. जेथे पाऊस झाला तो कमी दिवसांत जास्त झाला आहे. परिणामी सरासरीची आकडेवारी वाढली. प्रत्यक्षात निम्म्या महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस नाही. ७ व ८ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत ७ व ८ जुलै रोजी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी १ तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ९ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, २५ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के, ३४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान तर उर्वरित २८६ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथेही गंभीर स्थिती आहे. राज्यात खरीप पिकांचे उसासह सरासरी १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ५५.४२ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी ६३.५% पेरणी झाली होती.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान