राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. अशी घोषणा केली
राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस चालूच आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे तर विविध भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहे. अनेक लोकांचे कुटुंबांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. घर,संसार पूर्ण नामशेष झाले आहे, अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्याच ठिकाणी आज राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. तेव्हा त्यानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्यांचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. अशी घोषणा केली, सांगलीचा हा पूर मनुष्यनिर्मित नाही. कोयनेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यात आले होते. राज्य आपत्ती निवारण दलाची एक टीम कराडला ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. यासोबतचं रायगड आणि रत्नागिरी भागात देखील ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, व सर्व घटनाग्रस्त ठिकाणी हवी ती मदत पाहोचवली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य