• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


मा.पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या महिला आरोपीला १ महिन्यांचा पॅराल मंजूर


लिनी हरिहरन हिला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे
भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना तामिळनाडू सरकारने जन्मठेप शिक्षा सुनावली. या सात आरोपीपैकी एक असलेली नलिनी हरिहरन हिला एक महिन्याचा पॅरोल मंजूर झाला आहे. हा पॅरोल २५ किंवा २६ डिसेंबरपासून सुरू होईल. राज्य सरकारचे वकील हसन मोहम्मद यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती दिली. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही परोल मान्य केली आहे. एस पद्मा म्हणजे नलिनीच्या आईने खंडपीठाकडे याचिका केली, तिने याचिकेत म्हटले आहे की, 'तिला (पद्मा) अनेक आजार आहेत आणि आपल्या मुलीने आपल्यासोबत राहावे अशी त्यांची इच्छा आहे.' या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे महिनाभर पॅरोलसाठी अनेक अर्ज केले होते. अनेक अर्ज केल्यानंतर आता नलिनी हरिहरनला एका महिन्याचा पॅरोल मिळाला आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान