• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


मृत व्यक्तीला ७ महिन्यानंतर पहिली लस ; आरोग्य यंत्रणेचा बघा ढिसाळ कारभार


२ मे २०२१ रोजी निधन झालं होतं.७ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत पावलेल्या महिलेला १८ डिसेंबर रोजी लस दिल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय
औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबादच्या आरोग्य यंत्रणेचा ठिसाळ कारभार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७८ वर्षीय पार्वताबाई अहेलाजी पाटील यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजून ५ मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. याबाबत त्यांच्या मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे. मात्र, पार्वताबाई यांचं २ मे रोजी निधन झाले होते. ७८ वर्षीय पार्वताबाई अहेलाजी पाटील या २१ एप्रिल २०२१ ला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोना चाचणीत त्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे २ मे २०२१ रोजी निधन झालं होतं.७ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत पावलेल्या महिलेला १८ डिसेंबर रोजी लस दिल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय.या त्यांच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून या मुळे आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान