• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


‘नाम’ फाउंडेशनच्या वतीने नांदेड मध्ये १२१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत


बुधावारपासून रकमेच्या वाटपाला सुरवातही झाल्याचे नाम फाउंडेशन केशव घोणसे पाटील यांनी सांगितले




मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरच्यांना मदत करण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहेत. मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या शेतकरी आत्महत्या पाहता जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.तर वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यातील तब्बल १२१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर किमान लहान-मोठा व्यवसाय किंवा कठीण प्रसंगी त्यांना या रकमेचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा मदतीचा हात देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या रकमेचे चेक देण्यात आले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १२१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावेळी जिल्ह्यातील १२१ शेतकरी कुटुंबियांना मदत केली जाणार असून बुधावारपासून रकमेच्या वाटपाला सुरवातही झाल्याचे नाम फाउंडेशन केशव घोणसे पाटील यांनी सांगितले आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान