• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


झुंड चित्रपटाला रेटिंग नाही म्हणून हसणाऱ्यांनो ; आता रेटिंग पाहाल तर व्हाल हैराण


‘झुंड’ला १० पैकी मिळालेलं ९.३ रेटिंग




नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटावर अनेक ठिकांणांहून समर्थन आणि विरोध होत आहे. नागराज मंजुळे यांचा चित्रपट आला आणि त्यावर वाद झाला नाही असं कधीच होणार नाही. झुंड चित्रपटावर अनेक गोष्टीवरून चिथवण्यात आले. अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये दोन गट पडले. ‘झुंड’ हा बॉलिवूडमधला असा चित्रपट आहे, जो तुम्हाला आवडला असो वा नसो, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. या चित्रपटावरून सोशल मीडियावर विविध मतमतांतरे पहायला मिळत आहेत. असं असलं तरी चित्रपटाच्या कथेकडे, त्यातील कलाकारांच्या दमदार कामाकडे आणि चित्रपटातील भावनेकडे अनेकांनी लक्ष वेधलं आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कमाई दहा कोटींकडे जात असतानाच आता आयएमडीबी रेटिंगसुद्धा ९.३ इतकी पहायला मिळत आहे.आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते. त्यामुळे ‘झुंड’ला १० पैकी मिळालेलं ९.३ रेटिंग हे सर्वोत्तम आहे, असं म्हणायला हरकत नाही. ‘झुंड’ची कमाई आज पर्यंतची कमाई पहिला दिवस- १.५० कोटी रुपये, दुसरा दिवस- २.१० कोटी रुपये, तिसरा दिवस- २.९० कोटी रुपये, चौथा दिवस- १.२० कोटी रुपये, पाचवा दिवस- १.३० कोटी रुपये, एकूण- ९.०० कोटी रुपये


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान