• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार पंढरपूरमध्ये आढळले भीक मागताना


धक्कादायक ! ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार पंढरपूरमध्ये आढळले भीक मागताना




पंढरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार एम जी भगत हे पंढरपूरमध्ये अतिशय दयनीय अवस्थेत आढळून आले. अन्न पाणी आणि वैद्यकीय मदतीसाठी ते रस्त्यांच्या कडेला याचना करीत असताना पंढरपुरातील रॉबिनहुड आर्मीचे सदस्य सुजित दिवाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ही धक्कादायक बाब समोर आली. बुधवार, ९ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास भक्ती मार्गावरील सैनिक शाळेजवळ एक भिकारी व्यक्ती मदतीसाठी याचना करीत असल्याची बातमी रॉबिन हुड आर्मीचे सदस्य सुजित दिवाण यांना समजली. या माहिती वरुन दिवाण आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. नेहमी प्रमाणे लोकांशी संवाद साधत असताना भगत यांचा इंग्लिशमधील संवाद पाहून दिवाण अचंबित झाले. दिवाण यांनी अधिक विचारणा केली असता भगत यांनी सांगितले, मी वर्ध्याचा राहणारा आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मी गावाकडून निघालो, रेल्वेने प्रवास करीत असताना काय घडले माहीत नाही पण माझी बॅग, मोबाईल, पैसे सर्व गायब झाले.माझ्या हाताला पायाला जबरदस्त मार लागला आहे. मला काहीही हालचाल करता येत नाही माझी शुद्ध सारखी हरपते. एकच कपडे असल्याने माझी अवस्था भिकाऱ्या सारखी झाली आहे. तीन दिवस झाले मी रेल्वे स्टेशनच्या या बाहेरील रस्त्यांवर पडून आहे. लोक भिकारी समजून अन्न पाणी देतात. पण मी कोण हे समजून घेत नाहीत आणि मलाही तितका त्राण नाही.एम जी भगत यांचे वक्तव्य ऐकून भावुक झालेल्या सुजितने गुगलवर सर्च मारुन भगत यांची माहिती शोधली आणि तो ही अचंबित झाला. एक महान साहित्यिक, पत्रकार, संपादक या अवस्थेत पाहून त्यालाही गहिवरुन आले त्याने तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावून भगत यांना वैद्यकीय उपचारासाठी सोलापूर येथे हलविले आहे. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात भगत यांच्यावर उपचार सुरु आहेत. भगत यांची ही अवस्था का आणि कशामुळे झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कोण आहेत भगत........ मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या विभागात काम केले क्लास टू ऑफिसर, संपादक, लेखक, अनेक वृत्तपत्रांना संपादक, अनेक कंपन्यांचे संपादकीय संचालक होते. एम.जी भगत, मुलाचे नाव सुशील भगत, पत्ता हिंद नगर, हिंदुराष्ट्र भाषा समिती रेल्वे स्टेशन जवळ, वर्धा. ओळख सांगितल्यानंतर ते म्हणाले “Will you please arrange me 50 rupees? I will pay back. मला एक टॉवेल खरेदी करायचा आहे की जेणेकरून मी आंघोळ करू शकेल. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून दिला.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान