• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


नोकरी ! बँकेची नोकरी शोधता आहेत तर 'या' बँकेत सुरू आहे पदभरती


पंजाब नॅशनल बँकेत १४५ पदांची भरती
तुम्हाला बँकिंग क्षेत्रात अनुभव,आवड असेल किंवा तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल, तर पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करु शकता. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पंजाब नॅशनल बँकेनं pnbindia.in वर २० एप्रिल २०२२ रोजी so च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण १४५ पदांची भरती करण्यात आली आहे. ज्यामध्ये व्यवस्थापकाची ४० पदं, व्यवस्थापक (क्रेडिट) १०० पदं आणि वरिष्ठ व्यवस्थापकाची ५ पदं आहेत. पदासाठी शैक्षणिक पात्रता PNB मधील व्यवस्थापक पदांसाठी फायनान्समध्ये MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती करण्यात आली आहे. पदासाठी वयोमर्यादा मॅनेजर पदांसाठी २५ ते ३५ वर्ष आणि सिनियर मॅनेजर पदांसाठी २५ ते २७ वय असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ मे २०२२ आहे. पदांच्या भरतीसाठी १२ जून २०२२ रोजी परीक्षा घेतली जाईल.


महत्वाच्या बातम्याहवामान