• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


इंस्टाग्रामच्या टॉप -५ अभिनेता/अभिनेत्रीच्या यादीत आलिया भट्ट एकमेव भारतीय


या यादीत ती एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री




जबरदस्त अभिनयाने आपली छाप निर्माण करणारी अभिनेत्री आणि तरुण पिढीमध्ये प्रसिद्ध असणारी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील अभिनय आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न झाल्यानंतर आलिया भट्टची लोकप्रियता खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो प्रचंड समाज माध्यमांवर प्रचलित झाले होते. परिणामी आलिया भट्टचे नाव इंस्टाग्रामच्या टॉप ५ अभिनेता/अभिनेत्रीच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या यादीत सामील होणारी ती एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे काही दिवसांमध्ये आलिया भट्ट लवकरच ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया भट्ट निःसंशयपणे आपल्या देशातील प्रसिद्ध महिला अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करण्याव्यतिरिक्त, आलिया भट्ट RRR आणि तिच्या स्वत: च्या निर्मिती संस्थेत (Eternal Sunshine Productions) देखील काम करत आहे. यामुळेच सोशल मीडिया यूजर्सना आलिया भट्टच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते.


महत्वाच्या बातम्या



हवामान