• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


एलॉन मस्क बनला ट्विटरचा नवा मालक


पाच वर्षांपूर्वी ट्विटर व्यक्त केली होती विकत घेण्याची इच्छा




काही वर्षांपूर्वी मस्क यांनी ट्विटर आपली इच्छा व्यक्त केली होती की, मला ट्विटर खूप आवडते तर त्यावर ट्विटरच्या मालकाने सांगितले की विकत घेऊन टाका मग त्यावर तो म्हणाला 'किती मध्ये देतो ?' आज पाच वर्षानंतर एलॉन मस्क ट्विटर विकत घेतले आहे. टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी बऱ्याच दिवसांपासून ट्विटरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता थेट ट्विटर कंपनीच विकत घेतली आहे. ४४ अब्ज डॉलर्समध्ये हा करार पार पडला आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ५४.२० डॉलर या दराने प्रति शेअर विकत घेण्याची ऑफर एलॉन मस्क यांनी ट्विटरला दिली होती. ही ऑफर ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी उशिरा स्वीकारली. याबाबत एलॉन मस्क यांनी ट्वीट करत ट्विटर विकत घेतल्याचे जाहीर केले. या संदर्भात पूर्ण प्रक्रिया ही वर्षभरात पूर्ण होईल. दरम्यान, सध्याचे ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल हे सीईओ म्हणून कायम राहतील की त्यांच्या सीईओ म्हणून दुसऱ्या कोणाची नियुक्ती होते हे अद्याप स्पष्ट नाही. ट्विटर खरेदीच्या ट्विट व्यतिरिक्त एलॉन मस्क यांचे आणखी एक ट्विट देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोमवारी संध्याकाळी एलॉन मस्क यांनी हे ट्विट करत 'मला अशा आहे की, त्यांच्या सर्वात वाईट टीका अजूनही ट्विटर राहतील, कारण यालाच बोलण्याचे स्वतंत्र्य म्हणतात त्यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. एलॉन मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय राहता आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता. काहीवेळा त्याच्यावर टिकाकारांकडून टीका देखील केली जाते.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान