• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


'मला नाही वाटत फक्त हिंदी राष्ट्रभाषा..' साऊथच्या हिरोचं वादग्रस्त वक्तव्य


मुलाखतीत दिले हे वक्तव्य
अलिकडच्या काळात साऊथच्या चित्रपटांना प्रचंड मागणी आल्याचे दिसून आले. प्रचंड आवड भारतात त्याचा बद्दल निर्माण झाले आहे. मनोरंजन सृष्टीत काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या सोशल मीडियावर साऊथ अभिनेता किच्चा सुदीप चर्चेत आला आहे. या अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या ट्विटने हे प्रकरण वाढलं होतं. त्यांनतर अभिनेता किच्चा सुदीपने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केले आहे. इंडियन एक्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता सोनू सूदने या सर्व प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना अभिनेता सोनू सूद म्हणाला, 'मला नाही वाटत की फक्त हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हटलं जाऊ शकतं. भारताची एकच भाषा आहे आणि ती म्हणजे एन्टरटेनमेन्ट. या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमधून आहात. जर तुम्ही लोकांचं मनोरंजन करत असाल तर ते नक्कीच तुमचा स्वीकार करतील, प्रेम करतील आणि सन्मान देतील'. असं म्हणत अभिनेत्याने आपलं मत दिलं आहे. साऊथ चित्रपटांच्या यशाबाबत बोलताना अभिनेत्याने पुढे म्हटलं, ''आता मला वाटतं की साऊथ चित्रपटांचं यश हिंदी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बदल घडवून आणतील. मला वाटतं की आता दिग्दर्शक आणि निर्मात्यांना प्रेक्षकांच्या संवेदना समजून घ्यायला हव्या. कारण ते दिवस गेले जेव्हा लोक म्हणत असत आपलं डोकं घरी ठेऊन चित्रपट पाहायला जा.आता लोक विचारपूर्वक चित्रपटांची निवड करतात. लोकांना कोणत्याही ऍव्हरेज चित्रपटावर पैसे खर्च करायचा नसतो. त्यांना उत्तम हवं असतं'. या व्यक्तव्यानंतर प्रचंड चित्रपट सृष्टीत वादंग उठल आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान