• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


काल धुळेत आढळल्या तलवारी तर आज नांदेड ; राज्यात मोठा घातपात घडव्याचा प्लॅन ?


धुळ्यात काल पोलिसांनी तब्बल ९० तलवारी जप्त केल्या




राज्यात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता त्यात मोठी बाब म्हणजे काल धुळ्यात पोलिसांनी मोठ्याप्रमाणात तलवारी जप्त केल्या होत्या. तर आज नांदेडमध्येही पोलिसांना तलवारी सापडल्या आहेत. त्यामुळे शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेडमध्ये शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानं संशयावरून एका ai ऑटोची तपासणी केली असता या ऑटोतून २४ तलवारी नेल्या जात होत्या. गोकुळनगर भागात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. अमृतसरहून सचखंड रेल्वेनं तलवारी आणल्या गेल्या होत्या. केवळ विक्री करण्याच्या उद्देशानं तलवारी आणल्या होत्या की काही घातपाताचा कट होता, याची चौकशी पोलीस करतायत. त्याआधी धुळ्यात काल पोलिसांनी तब्बल ९० तलवारी जप्त केल्या. मुंबई-आग्रा हायवेवर पेट्रोलिंग करताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने गाडी न थांबवता पुढे नेली, पोलिसांनी पाठलाग करुन गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता गाडीत तब्बल ९० तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.महाराष्ट्रात हिंसा घडवण्याचा कट आहे का? इतक्या मोठ्या प्रमाणावर तलवारी कोण आणि का मागवत आहे? याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.


महत्वाच्या बातम्या



हवामान