• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


जॅकलिनला ईडीचा दणका ! ७ कोटीची मालमत्ता जप्त


लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू जप्त
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची ७ कोटी १२ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं जोडले होते. ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितलं होतं की सुकेशने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने जॅकलिनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलला होता.जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही समोर आले होते. ईडीला सुकेशने जॅकलिनला दिलेली सुमारे ७ कोटी रुपयांची मालमत्ता ही गुन्ह्यातून कमावलेली मालमत्ता असल्याचं आढळून आले. यानंतर कारवाई करत ईडीने जॅकलिनच्या या मालमत्ता जप्त केल्या आहेत.


महत्वाच्या बातम्याहवामान