• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


रोहित नंतर हा असणार भारतीय संघाचा नवा कर्णधार


श्रेयस अय्यर यांची नाव आघाडीवर




विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे कर्णधार पद रोहित शर्माकडे गेले होत. त्यानंतर नवा कर्णधार कोण याची कमालीची उत्सुकता सर्वांमध्ये होती. आयपीएलच्या निमित्ताने के एल राहुल, हार्दिक पांड्या यांना आजमावण्याची संधी बीसीसीआयला मिळाली आहे. गुजरात टीमची कामगिरी पाहता त्याने ही जबाबदारी उत्तम पार पडली आहे.काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचं नाव टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी आघाडीवर होते. त्यामुळे लिमिटेड ओव्हर्समध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पांड्याकडे जाऊ शकते अशी चर्चा होती. हार्दिक पांड्या नाही तर आणखी एक पर्याय टीम इंडियाला मिळाला आहे. के एल राहुल देखील उत्तम कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध सीरिजमध्ये के एल राहुलला विशेष कामगिरी करता आली नाही. रवि शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार के एल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नाव आघाडीवर असतील. या तिघांपैकी एकाकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे


महत्वाच्या बातम्या



हवामान