• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बातमी ! राज्यसेवाची जाहिरात प्रसिद्ध


१२ मे ते १ जून पर्यंत परीक्षेसाठीसाठी अर्ज करता येणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासनात काम करण्यासाठी चांगली संधी आहे. परीक्षा ३ टप्प्यांमध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत... या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळाला भेट द्यावी. १२ मे ते १ जून पर्यंत परीक्षेसाठीसाठी अर्ज करता येणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगने प्रसिद्ध केली आहे. विविध पदांसाठी १६१ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदावार कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला हवे. या पदांसाठी होणार भरती १) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा, गट अ २) मुख्याधिकारी, गट अ ३) बालविकास प्रकल्प अधिकारी, गट ब ४) सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट ब ५) उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - ब ६) कक्ष अधिकारी, गट ब ७) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान