• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


आदिनाथ कोठारे यानी उर्मिला सोबतच्या नात्याबद्दल केलं मोठं वक्तव्य


आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांच्या नात्यात बिनसल्याच्या बातमीच्या चर्चांना उधाण
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखले जाणारे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते.या जोडीनं २०११ मध्ये सप्तपदी घेतली. अर्थातच या नातं जुळलं ते महेश कोठारे यांच्या 'शुभमंगल सावधान' या सिनेमाच्या सेटवर. ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन महेश कोठारे यांच्याकडे होतं. आदिनाथही तिथे दिग्दर्शनाचे धडे घेत होता. उर्मिलाचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमामुळे आदिनाथ-उर्मिलाची लव्हस्टोरी सुरु झाली. यानंतर एक दोन वर्षात दोघांचं स्वतःचं 'शुभमंगल' पार पडलं.. या गोड जोडीला एक गोंडस मुलगी आहे. लग्नानंतर उर्मिलाने इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला. घरचं प्रॉडक्शन हाऊन असूनही ती अभिनयापासून लांब राहिली. मात्र अचानक उर्मिलाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत ती दिसू लागली. आता चर्चा होतेय की घरचं प्रॉडक्शन हाऊस असताना इतक्या वर्षांनी उर्मिला दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेतून पुर्नपदार्पण का करतेय? याचं अद्याप कोणतं स्पष्टिकरण प्रश्न उर्मिलाकडून आलेलं नाही. यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे उर्मिला-आदिनाथमध्ये काही तरी बिनसल्याची. आणि हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण आता आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण समोर आलंय ज्यानं यांच्यात बिनसल्याच्या बातमीच्या चर्चांना उधाण आलं आहे. उर्मिलाचा ४ मे रोजी वाढदिवस झाला. आदिनाथ नेहमीच याआधी बायकोच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देतो किंवा दोघं एकत्र सेलिब्रेशन करताना अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसायचे. पण यावर्षी मात्र तसं काहीच आदिनाथनं केलं नाही. त्यानं बायकोच्या वाढदिवशी एकही शुभेच्छा देणारी साधी पोस्टही शेअर केली नाही. आणि इथच त्यांच्या दुराव्याच्या बातमीने जोर धरला. मात्र आता यावर आदिनाथने माध्यमांशी साधलेल्या संवादात आदिनाथ म्हणाला की, या सगळ्या केवळ अफवा आहेत. यावर मी आणि उर्मिला बिलकूल लक्ष देत नाही. आमच्या आयुष्यात आम्ही एकदम खूश आहोत. सध्या आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत. त्यामुळे लोकं काहीही बोलत आहेत. पण आमच्यात अजिबात काहीच बिनसलेलं नाही.


महत्वाच्या बातम्याहवामान