• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


शाहरुख खानला आयपीएल दरम्यान मोठा धक्का !


केकेआरच्या टीममधून दुखापतीमुळे एक खेळाडू माघार घेणार
कोरोना नंतर यावर्षी आयपीएल मोठा उत्साहात खेळल्या जात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ७ व्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला एक मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमध्ये दुखापतीची मालिका सुरुच आहे. केकेआरच्या टीममधून दुखापतीमुळे एक खेळाडू माघार घेणार आहे. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा मालक शाहरूख खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोलकाता टीमचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कमिन्सला हिपची दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्याची ही दुखापत जास्त गंभीर नसली तरीही त्याचं इंटरनॅशनल शेड्यूल पाहता तो आयपीएलमधील पुढील सामने खेळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता टीम प्लेऑफ गाठण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशातच पॅट कमिन्स पुन्हा मायदेशी जात असल्याने कोलकाता टीमच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान