• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


शिवसेनेला आव्हान ! औरंगाबादेतील औरंगजेबचं थडगं जमीनदोस्त करण्याची मनसेची मागणी


थडगं उद्धवस्त करण्याची मागणी
राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादेत बहुचर्चित सभा पार पडली त्या नंतर अनेक वाद उफाळून आले. राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना नुकताच अकबरूद्दीन ओवेसी यांची औरंगाबाद मध्ये सभा पार पडली. सभेच्या आधी त्यांनी औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यातील वातावरण चागलेच तापलेले असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचं हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का? हे थडगं जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेनं उपस्थित केलेत. तसेच पुढे बोलताना हे थडगं काय अकबरोद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का असा सवाल मनसेनं थेट औवेसींचा उल्लेख टाळत केलाय. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केलाय.


महत्वाच्या बातम्याहवामान