• 7 August 2022 (Sunday)
  • |
  • |


वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य ! बघा काय म्हणाली


बॉलीवूड स्टार किड्स पुन्हा कंगणाच्या निशाण्यावर
सुप्रसिद्ध आणि नेहमी आपल्या वेगवेगळ्या विषयावरील वक्तव्याने प्रसिद्धीत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सर्वांच्या लक्षात असती. कंगनाला एखादी गोष्ट आवडत नसेल, तर ती त्या गोष्टीला उघडपणे विरोध करते. कंगना राणौत रोज स्टार किड्सना आपल्या टार्गेटवर घेत असते आणि पुन्हा एकदा तिने बॉलिवूडच्या स्टार किड्सबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तिने साऊथ सिनेसृष्टी आणि तिच्या स्टारबद्दल बोलताना हे सांगितले आहे की, साऊथ सिनेसृष्टीतील स्टार्सच्या तुलनेत बॉलीवूडच्या स्टार किड्सशी कनेक्ट होणं प्रेक्षकांना कठीण जात असल्याचंही अभिनेत्रीने म्हटलं आहे. कंगना राणौत म्हणाली, 'दक्षिण भारतीय चित्रपटातील स्टार्स ज्या प्रकारे स्वत:ला प्रेक्षकांशी जोडतात, ते खूप मजबूत आहे. तिथले कलाकार रसिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात आणि आपले काय होते. त्यांची मुले (स्टार मुले) त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जातात. इंग्रजीत बोला, फक्त हॉलिवूड चित्रपट बघा. चाकू आणि चमचा याबरोबर अन्न खा. मग सांगा आमचे प्रेक्षक त्यांच्याशी कसे जोडले जाणार? आपला मुद्दा पुढे करत कंगना म्हणाली, 'हे लोक दिसायलाही विचित्र दिसतात, ते उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात. त्याचा संपूर्ण लुकच बदलला आहे, मग लोकांचे नाते कसे असणार आहे. कोणालाही ट्रोल करण्याचा माझा हेतू नाही. यानंतर कंगना राणौतने नुकतेच प्रदर्शित झालेल्या दक्षिण चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचे कौतुक केले आणि सांगितले की, आजच्या काळात बॉलीवूडमध्ये मजुरांसारखा दिसणारा एकही स्टार नाही.


महत्वाच्या बातम्याहवामान