• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


झी टॉकीजवर ‘डार्लिंग’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


रविवार १७ जुलैला दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वा डार्लिंग चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर रंगणार
प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधीतरी प्रेमात पडतोच, त्या प्रेमाला हळुवारपणा, आनंद, विरह, दु:ख, त्याग असे अनेक रंग असतात. प्रेमभावनेचे असेच अनोखे रंग दाखवणारा डार्लिंग हा मनोरंजक मराठी चित्रपट येत्या रविवारी झी टॉकीजवर पहायला मिळणार आहे. रविवार १७ जुलैला दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वा डार्लिंग चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर रंगणार आहे. डार्लिंग चित्रपटाची कथा आहे... बबली, राजाभाऊ आणि तुषारच्या अल्लड आणि अवखळ प्रेमाची. बबली ही तुषारच्या (प्रथमेश परब) प्रेमात पडलेली असते. त्या दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम असते. राजाभाऊ (निखिल चव्हाण) देखील बबलीवर प्रेम करीत असतो. त्याचे हे प्रेम एकतर्फी असते. तोदेखील बबलीला मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या करीत असतो. त्यातून उडणारी धमाल म्हणजे ‘डार्लिंग’ हा चित्रपट. रूढ अर्थाने आपण ज्याला प्रेमाचा ‘त्रिकोण’ म्हणतो तशा प्रकारची ही कथा असली तरी त्याही पलीकडे ही नात्यांची गोष्ट आहे. वेगवेगळ्या नात्यांची ही गोष्ट दाखवताना प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची स्पंदन अचूक टिपणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे या कलाकारांनी या चित्रपटात धमाल केली आहे. रविवार १७ जुलैला दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वा डार्लिंग चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर अवश्य पहा.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान