• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपट आता 'या' अभ्यासक्रमात, वाचा सविस्तर


२०११ साली झाला होता चित्रपट प्रदर्शित
जिंदगी ना मिलेंगी दोबरा हा चित्रपट फक्त देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. हृतिक रोशन,कतरिना कैफ,अभय देओल,फरहान अख्तर आणि कल्की कोचलीन स्टारर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाने तरुणाईला अक्षरशः वेड लावले होते . या चित्रपटाची थीम आणि गाणी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. या चित्रपटाच्या कलाकरांसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट स्पेन मध्ये चित्रित करण्यात आला होता. यामुळे चित्रपटाने स्पेनचे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढवले होते. या चित्रपटानंतर स्पेनच्या टुरिझममध्ये ३२ टक्के वाढ झाली होती. कारण 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट स्पेनच्या विविध ठिकाणी शूट करण्यात आला होता. स्पेनच्या अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग करण्यात करण्यात आले होते. या चित्रपटानंतर या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली होती.त्यांनतर आता हा एकदा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचा समावेश आता स्पेनमधील कॉलेज अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. वास्तविक हा एक मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्स आहे. या कोर्समध्ये आता हा चित्रपट अभ्यासावा लागणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आता मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्सच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान