• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


उद्या भारत विरूद्ध इंग्लंड होणार निर्णायक सामना, वाचा पूर्ण


मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१असे बरोबरीत
भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड मध्ये रविवारी वनडे सीरीज मधला शेवटचा सामना खेळला जाणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना मँचेस्टर मध्ये होणार आहे. पहिला सामना भारताने १० विकेट राखून जिंकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये इंग्लंडने पलटवार केला व त्यांनी भारताला १०० धावांनी पराभूत केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणि जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश टीम मालिका विजयाच्या हेतूने उद्या मैदानात उतरेल. हा सामना जिंकण्यासाठी भारताच्या टॉप ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु उद्या खेळवल्या जाणाऱ्या मैदानावर वनडे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने ३९६ धावा केल्या होत्या. या मैदानावर भारताची सर्वाधिक धावसंख्या ३३६ आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी ३.३० वाजता सुरु होणार. भारत आणि इंग्लंडमधल्या वनडे सामन्याचे लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन ३ वर पाहता येईल.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान