• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


आयसीसीचा खराब कामगिरीमुळे विराट कोहलीला मोठा धक्का


वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही विराट कोहली




विराट कोहली सध्या त्याच्या वाईट परिस्थितीतून जात आहे. देशासह जगभरातील क्रिकेट प्रेमी या गोष्टीमुळे नाराज आहेत. एकेकाळी तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी क्रमवारीत अधिराज्य गाजवणारा विराट कोहली आता खराब फॉर्ममुळे खाली घसरलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोहलीला एक स्थान गमवावं लागलं असून तो तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. २०१५ नंतर प्रथमच किंग कोहली एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या ३ मधून बाहेर पडलाय. इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर कोहलीच्या क्रमवारीत ही घसरण झालीये. कोहलीने मांडीच्या दुखापतीमुळे पहिला एकदिवसीय सामना खेळला नसला तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला अनुक्रमे १६ आणि १७ रन्स करता आले. वनडे व्यतिरिक्त कोहलीला कसोटी क्रमवारीतही खूप फटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत २०१६ नंतर प्रथमच कोहली पहिल्या १० मधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या टी २० क्रमवारीबद्दल बोललो तर तो २४ व्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही कोहलीची कामगिरी विशेष झाली नाही. विराट कोहलीच्या सांगण्यावरून बीसीसीआयने त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती दिलीये. टीम इंडियाला विंडीज दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान