• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


पासपोर्ट रँकिंग मध्ये हा देश पहिला,जाणून घ्या आपल्या देशाचा क्रमांक


६० देशांमध्ये भारतीय नागरिक करू शकतो विना विसा प्रवास
जगातील सर्व देशांच्या पासपोर्ट्सचे रँकिंग जाहीर झाले सर्वात पॉवरफुल आणि सर्वात खालच्या क्रमांकावर पासपोर्ट कोणत्या देशाचा हेही स्पष्ट झाले आहे. जपानचा पासपोर्ट पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सने ही यादी जाहीर केली असून जपाननंतर, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि दक्षिण कोरिआ तर तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी व स्पेन यांचा पासपोर्ट आहे. या यादीत भारतीय पासपोर्ट ८७ व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. या रँकिंगनुसार , जपानचा पासपोर्ट प्रथम क्रमांकावर असून जपानी पासपोर्टधारक १९३ देशांत व्हिसामुक्त अथवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावरील सिंगापूर आणि दक्षिण कोरिआचा पासपोर्ट असलेले नागरिक १९२ देशांमध्ये जाऊ शकतात. ज्या व्यक्तीकडे भारतीय पासपोर्ट असेल ते विना व्हिसा ६० देशांमध्ये प्रवास करू शकतात. तर या यादीत पाकिस्तान १०९ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा पासपोर्ट ज्यांच्याकडे असेल ते ३२ देशांत व्हिसाशिवाय फिरु शकतात. या यादीत सर्वात शेवटचे स्थान अफगाणिस्तानला मिळाले आहे. अफगाणिस्तान पासपोर्ट असलेले नागरिक २७ देशांमध्ये प्रवास करू शकतात.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान