• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


अमरावतीत तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू


वसतिगृह प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची पालकांकडून मागणी
अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व तेथीलच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आदर्श नितेश कोगे (वय १३) रा. जामली या आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृतदेह सापडला. ही घटना कळताच विद्यालय व वसतिगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. शिवाय, विद्यार्थीही चांगलेच धास्तावले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. अमरावती पोलीस तपास करत आहेत. मृतक आदर्शने बुधवारीच आपल्याला कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात. आपण येथे राहत नाही, असे तो म्हणाला होता. आदर्शच्या मृत्यूस वसतिगृह व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे एका तक्रारीतून केली.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान