• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


पदवीधारक आहात तर करू शकता गूगल मध्ये जॉब, वाचा सविस्तर


पदवी शिक्षण पूर्ण झालेले आणि सल्लागर म्हणून काम करण्याची इच्छा




आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुमचीही अशी इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गूगल कंपनीमध्ये मोठी बंपर भरती आहे. पदवीप्राप्त उमेदवारांना गूगलमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. गूगल कंपनीच्या वेगवेगळ्या ऑफीसमध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदवी शिक्षण पूर्ण झालेले आणि सल्लागर म्हणून काम केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. गूगल की पार्टनरशिप टीम जाहिरात, रिसर्च, हेल्थ, रिटेल, पेमेंट, पब्लिशिंग, डेवलपिंग अशा क्षेत्रांमध्ये गूगलच्या भागीदार संस्थेसोबत मिळून गूगल कंपनीच्या गरजा, व्यवस्या, लक्ष्य आणि उत्पन्न मिळवण्यासाठी काम करते. गूगल कंपनीला गूगल की पार्टनरशिप टीमसाठी पदवी प्राप्त आणि आयटी अनुभव असलेले उमेदवार हवे आहेत. यांची भरती आईटी, मीडिया, रीटेल, ई-कॉमर्स, हार्डवेयर, सॉफ्टवेयर तसेच गेमिंग विभागात सल्लागार म्हणून करण्यात येईल. या भरती अंतर्गत अमेरिकेतील कॅलिफॉर्निया, शिकागो, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा आणि वॉशिंग्टन डीसी येथील ऑफिसमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. गूगलच्या या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला Google Careers च्या पेजवर जाऊन किंवाhttps://careers.google.com/jobs/results/ यावर क्लिक करून अर्ज दाखल करावा लागेल.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान