• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


आधी मंत्रीपद देणारी टोळी,तर आता पकडली राज्यपालपद देणारी टोळी


१०० कोटीमध्ये राज्यपाल पद देण्याचे आश्वासन
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरू असताना. देशात अनेक ठिकाणी राजकीय लोकांना गंडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यसभा सीट राज्यपाल आणि अन्य पदासाठी लोकांकडून पैसे घेणाऱ्या चौघांना सीबीआयने अटक केली आहे.या आरोपींना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अटकेत असणाऱ्या तिघांची नावं कमलाकर प्रेमकुमार बांदगर, रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आहे. तसंच आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. 100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट तसेच राज्यपाल पद देण्याचे आश्वासन हे आरोपी देत होते. या आधीच राज्यात मंत्रीपद देणारी टोळी जेरबंद करण्यात आली होती.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान