• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


उद्या होणार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा वनडे, असा असेल भारतीय संघ


वेस्ट इंडिजला त्याच्या घरात पहिल्यांदा क्लीन स्वीप करण्याची संधी




भारतीय संघाने पहिल्या दोन वनडे मध्ये विजय मिळवला. हे दोन सामने जिंकून संघाने मालिका आधीच आपल्या नावांवर केली आहे. टीम इंडियाकडे आता वेस्ट इंडिज क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना उद्या बुधवारी होणार आहे. तिसऱ्या वनडे आधी राहुल द्रविड प्लेइंग ११ मध्ये बदल करतील का? हा प्रश्न आहे. पहिले दोन सामने बेंचवर बसलेल्या खेळाडूंना राहुल द्रविड संधी देतील का ? असा प्रश्न आहे. भारताने वेस्ट इंडिजवर विजयी आघाडी घेतली असली, तरी तिसरा वनडे सामना भारतासाठी खास आहे. कारण भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजला त्याच्याच घरात क्लीन स्वीप केलेले नाही. आता टीम इंडियाकडे मोठी संधी आहे. इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन (कॅप्टन), दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि शार्दुल ठाकूर,


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान