• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


महापुरुषांच्या गाण्यावरून वाद, दलित कुटुंबाला मारहाण


हळदीच्या कार्यक्रमात घडला प्रकार
यवततमाळ जिल्ह्यातील पुसद इथं एक संतापजनक घटना घडली. एका दलित कुटुंबाला गावातील सरपंचानेच मारहाण केली. याप्रकरणी तक्रार दाखल करुन गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. एकूण नऊ जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हळदीच्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या डीजेवरील गाण्यावरुन वाद झाला. महापुरुषांचं गाणे डीजेवर का लावले, यावरुन सरपंचाने सवाल उपस्थित केले. त्यानंतर ते गाणं बंद करण्यावरुन वाद घातला. नंतर आपल्या काही साथीदारांना घेऊन येत सरपंचाने कुटुबीयांना मारहाण केली. यावेळी प्रचंड बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत काहींच्या पाठीवर जबर जखमा झाल्या. तर जातीवाचक शिवागाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अखेर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील कारवाई केली जातेय. सध्या पुसद पोलिस याप्रकरणी सगळ्यांचीच चौकशी करत आहेत. ऍट्रोसिटीसह अन्य गुन्हे पोलिसांनी दाखल केलेत.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान