• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


विदर्भ दौऱ्याबद्दल अजित पवार यांचे स्पष्टीकरण, म्हणाले..


पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी पवार यांची सरकारला मागणी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचे असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. अतिवृष्टीने शेतकरी व्याकूळ झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ही गंभीर स्थिती असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं पूरग्रस्त भागात तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणांची आवश्यकता आहे, ते त्यांना उपलब्ध करुन दिले पाहिजे. या समस्यांवर तर कोणी बोलतच नसल्याचे अजित पवार म्हणाले.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान