• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


सकाळी उठल्या उठल्या खात असताल हे पदार्थ तर जाणून घ्या परिणाम


जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम
आपण जण सकाळी उठल्या उठल्या काही ना काही खात असतो. सकाळी उठल्यावर चहा आणि नाश्ता हा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. काहींना तर चहासोबत चटपटीत स्नॅक्स खायची सवय असते. म्हणजे स्नॅक्सशिवाय त्यांना चहा घेणे आवडतच नाही. काही जणांना फक्त स्नॅक्स खायला आवडतात. निवांत बसून गप्पा मारताना काही तरी खायला लागते, म्हणून चटपटीत स्नॅक्स खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु असे स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नसल्याचे न्यूट्रिशन एक्सपर्टचे मत आहे. मुख्य म्हणजे चहा आणि स्नॅक्स शक्यतो एकत्र खाऊच नयेत. चहा आणि चटपटीत पदार्थांचा एकत्रित स्वाद कितीही आवडत असला तरी त्याचं एकत्र सेवन करू नये, असा सल्ला न्यूट्रिशन एक्सपर्ट देतात. स्नॅक्स पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी चहा आणि स्नॅक्स एकत्र खाण्याचे काही दुष्परिणाम सांगितले आहेत. खारट-तिखट असलेले चटपटीत स्नॅक्स पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मुख्य म्हणजे ते पदार्थ बनवण्याची प्रक्रिया हानिकारक आहे, असे ते सांगतात. हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदा रिफाइन्ड कार्बोहायड्रेट असतो. त्याच्या सेवनामुळे शरीरातली चरबी वाढते. रिफाइन्ड कार्बोहायड्रेट थेट इन्सुलिन फॅट गेन हॉर्मोन ट्रिगर करण्याचे काम करते.स्नॅक्स आणि चहामधून शुगर कोटिंगसारखी टॉक्सिन्स शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे यकृतावरही परिणाम होऊ शकतो. स्नॅक्सच्या सेवनामुळे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे या गोष्टी खाण्यापासून टाळाव्या.


महत्वाच्या बातम्याराजकीय

आरोग्य

हवामान