• 6 December 2023 (Wednesday)
  • |
  • |


ईडीच्या छापेमारी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, मरेन पण....


छापेमारी नंतर एकामागे एक संजय राऊत यांचे तीन ट्विट




गोरेगावच्या पत्रा चाळ प्रकरणी आज संजय राऊत यांच्या घरी सकाळी ईडीची टीम चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्या टीमध्ये दहा अधिकारी असल्याची माहिती संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर एकच राजकीय खळबळ सुरू झाली. अनेक नेत्यांकडून या वर प्रतिक्रिया येत आहे. स्वतः संजय राऊत यांनी ट्विट केले आणि म्हंटले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, ईडीची धाड पडताच संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असे म्हटले आहे. तसेच त्यांनी तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी खोटी कारवाई..खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असे ट्विट केले आहे. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असं त्यांनी नुकतंच ट्विट केले आहे.


महत्वाच्या बातम्या



राजकीय

आरोग्य

हवामान